लोणावळ्याचा भुशी डॅमचा फिल आता सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात
सातारा | पावसाळा म्हटलं की पर्यटक धबधब्यावर भिजण्यासाठी अतुरलेले असतात. त्यासाठी डोंगरदऱ्यात, घाटमाथ्यावर जात असतात. पुणे- मुंबई व प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक लोणावळ्याचा भुशी डॅमला सर्वाधिक पसंती देताना दिसतो. परंतु, आता या भुशी डॅमचा फिल सातारा जिल्ह्यातील मेटगुताडला मिळणार आहे. त्यामुळे सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वर परिसरातील मेटगुताडला पर्यटकांना एक चांगलीच भिजण्याची पर्वणी मिळणार आहे.
महाबळेश्वर- पाचगणी या राज्यमार्गावर मेटगुताड ग्रामपंचायतीने नैसर्गिक जलस्त्रोतांचा वापर करून लोणावळा सारखा भुशी डॅम प्रमाणे पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम प्रमाणे सांडव्यातील प्रवाह बरोबर पायऱ्या तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्यापूर्वी ते काम पूर्ण केले जाणार आहे. पावसाळ्यात येणाऱ्या हंगामात पर्यटकांना आकर्षित करण्याचे हेतूने हा उपक्रम राबविला जाणार आहे.पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महाबळेश्वर- पाचगणी बरोबर मेटगुताडला आता नवा उपक्रम राबविला जात आहे. या डॅममुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत मिळणार आहे. पावसासोबत डॅमवर भिजण्याचा आनंद आता या पावसाळ्यापासून पर्यटकांना घेता येणार आहे.
प्रति भुशी डॅम मेटगुताडला उपसरपंच महादेव कांबळे
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून याठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट दिसत आहेत. परंतु, धबधब्याचे आकर्षण व पावसाळ्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळा, ठोसेघर, नवजा, वजराई येथे भिजण्यासाठी जात असतात. मात्र, आता महाबळेश्वर परिसरात लोणावळ्याच्या भुशी डॅम मेतगुताडला (ता. महाबळेश्वर) प्रति भुशी डॅम उभारला जात आहे. मेतगुताडचा प्रतिभुशी डॅम पावसाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचे उपसरपंच महादेव कांबळे यांनी माहिती दिली.