राज्यातील 119 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : सातारा, कराड, फलटण, वाई व दहिवडीला नवे अधिकारी
मुंबई । महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील 119 अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश आले रात्री उशिरा देण्यात आले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड, वाई, फलटण, दहिवडी व खंडाळा येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून कराडचे तत्कालीन डीवायएसपी सुरज गुरव यांची पुणे इथून आता नांदेड शहर येथे बदली करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस ठाण्याच्या डीवायएसपी शितल जानवे यांची पुणे येथे सुरज गुरव यांच्या जागेवरत अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. सातारा ग्रामीण पोलीस अधिकारी गणेश रामचंद्र किंद्रे यांची यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी गजानन टोम्पे हजर होणार आहेत. फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी दिलीप बरडे यांची बदली पुणे ग्रामीण (भोर) पोलिस ठाण्यात झाले आहे. तर त्यांच्या जागी पुणे ग्रामीणचे राहुल धस हे हजर होणार आहेत. कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत जगन्नाथ पाटील यांची नाशिक ग्रामीण येथील मालेगाव छावणी या ठिकाणी बदली झाली आहे. तर कराडला अमोल नारायण ठाकूर हे गडचिरोली जिल्ह्यातून हजर होतील.
दहिवडी पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अश्विनी रामचंद्र शेडगे या हजर होतील.
आप्पासाहेब शेवाळे खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र पोलीस उपाधीक्षक यांची बदली सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर येथे झाले असून प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्यांच्या ठिकाणी शशिकांत वाखारे अमरावती यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी दिनेश कदम हजर होतील.