क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

(Video) हज यात्रेला निघालेली ट्रॅव्हल्स तासवडे टोलनाक्यावर जळाली

सांगली जिल्ह्यातील मिरज परिसरातील 40 प्रवाशी

कराड | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजहून- मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या ट्रव्हल्स अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. तासवडे टोलनाका (ता. कराड) येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बसमधून 40 प्रवाशी हज यात्रेला जाण्यासाठी प्रवास करत होते. या घटनेमुळे टोलनाका परिसरात लोकांची चांगलीच धावपळ उडाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी, डाॅल्फीन कंपनीची खासगी प्रवासी वाहतूक बस (क्रमांक- एम.एच. 03-सी.पी. 4500) ही रात्री प्रवासी घेऊन मिरजहून- मुंबईकडे निघाली होती. यावेळी कराड येथे ट्रॅव्हल्सया टायर पंक्चर झाल्याने तिथे थांबली होती, तेथून पुढे ती निघाली होती. काही अंतरावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तासवडे टोलनाक्यानजीक आल्यानंतर या बसला पाठीमागील बाजूस आग लागल्याची माहिती पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांनी बस चालकास दिली. तेव्हा तातडीने सर्व प्रवासी खाली उतरवण्यात आले.

या आगीची माहिती कराड नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला देण्यात आल्यानंतर काही वेळात गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशामक दलाने अवघ्या पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवत मोठी दुर्घटना टाळली. यावेळी तळबीड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश भोसले, प्रविण गायकवाड, होमगार्ड खडके, आकाश माने घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेची अधिक माहिती तळबीड पोलिस घेत आहेत. सुदैवाने, या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही, मात्र ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker