सभेचा ट्रीझर रीलीज : शरद पवारांचा 25 रोजी सातारा, कोल्हापूर दाैरा
सातारा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवारांची तोफ राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शुक्रवारी धडाडणार आहे. शुक्रवार (दि. 25) रोजी दहिवडी येथे जाहीर सभा आणि कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप सोबत सत्तेत गेल्यानंतर प्रथमतः शरद पवार यांनी कराडमध्ये येवून आपली भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर पुन्हा आता दहिवडी, वडूज व कराड या मार्गावरून कोल्हापूरला श्री. पवार जाणार आहेत. कोल्हापूरच्या
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी स्वतः कडे जबाबदारी घेतली आहे. अशावेळी शरद पवार यांचा सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी काॅंग्रेसने 48 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला असून यावर शरद पवार काय भूमिका मांडणार याकडेही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. कोल्हापूरला जाहीर सभेच्या निमित्ताने जाताना खासदार शरद पवार बारामतीवरून फलटणमार्गे दहिवडी येथे येणार आहेत. दहिवडीत त्यांच्या उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
बीडनंतर आता राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या भूमीत आदरणीय पवार साहेबांची #स्वाभिमान_सभा! pic.twitter.com/WBiPZBEGcU
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 21, 2023
शरद पवार हे शुक्रवारी सकाळी 10 वाजता दहिवडीत येणार आहेत. सकाळी 10.15 ते 11 या वेळेत दहिवडी कॉलेजमध्ये त्यांच्या हस्ते गरजू मुलींना सायकलचे वाटप होईल. सकाळी 11.15 ते 11.45 दहिवडी नगरपंचायत इमारतीचे उद्घाटन आणि त्यानंतर दहिवडी येथील बाजार पटांगणावर कार्यकर्ता संवाद मेळावा तसेच जाहीर सभा होईल. दुपारी 2.30 वाजता दहिवडी येथून वडूज, पुसेसावळी, कराडमार्गे ते कोल्हापूरला जाणार आहेत.