खंबाटकी घाटात ट्रक 150 फूट खोल दरीत कोसळला : चालकाने उडी मारली अन्

सातारा। पुणे- बेंगलोर महामार्गावर खंबाटकी घाटात आज मालट्रक सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळला. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. ट्रकमध्ये केमिकल लिक्विडने भरलेले बॅलर असल्याने घाट चढत असताना अवजड मालामुळे ट्रक चढाणे माघारी येऊ लागला आणि थेट दरीत कोसळला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत चालत्या ट्रकमधून उडी मारली आणि तो बचवला आहे
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात आज सोमवारी सकाळी 11 वाजता एक ट्रक चढ चढत होता. या ट्रकमध्ये केमिकल लिक्विडने भरलेले बॅलर भरलेले असल्याने ट्रकला बोजा जादा झाल्याने ट्रक रिव्हर्स आला. ट्रक रिव्हर्स येताना सुदैवाने पाठिमाने कोणतेही वाहन नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
संपूर्ण मालाने भरलेला ट्रक दरीत कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घटनेची माहिती समजताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरीत पडलेल्या ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.