Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसातारा

साताऱ्यातील चोरी दोघांना पुण्यातून 6 लाख 30 हजाराच्या मुद्देमालासह अटक

सातारा |  शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावचे हद्दीत अॅशबो इंडस्ट्रिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील उघडे दरवाज्यातून आत प्रवेश करुन कंपनीमध्ये असलेले एकून 1 लाख 90 हजार 890 रुपये किमतीचे 707 किलो वजनाचे अॅल्युमिनीअम सेक्शनचे मटेरीयल चोरुन नेले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना पिंपरी चिंचवड येथून अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून एकूण 6 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिंदेवाडी येथील अॅशबो कंपनीतील चोरीच्या गुन्ह्यात सीसीटीव्हिची तपासणी करून लखन सुरेश अवचिते (ता. गणेशनगर- मोशी, ता. हवेली जि. पुणे) व अशांक विलास खिल्लारे (रा. शांतीनगर- भोसरी) या दोघांना पिंपरी चिंचवड येथे शोध घेवून त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात आरोपींकडून एकूण 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनीअम सेक्शनचे मटेरिअल व 4 लाख रूपये किमतीची महिंद्रा पिकअप गाडी असा एकुन 6 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

भापोसे पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरिक्षक सतिश आंदेलवार, अब्दुल हादी बिद्री, सफौ. अनिल बारेला, पोलीस हवालदार सचिन वीर, जितेंद्र शिंदे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मोझर, अजित बोराटे यांनी सदर कारवाईल सहभाग घेतला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close