कारखाना सभासदांच्या आरोग्यासाठी कृष्णा हाॅस्पीटल मोफत करण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. सुरेश भोसले
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
कराड | कृष्णा कारखान्याच्या आधुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर असून सध्या निम्मा कारखाना नव्या यंत्रणांनी आधुनिक बनला आहे. आधुनिकीकरणामुळे आता गाळप क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. कारखान्यांच्या सभासदांना व त्याच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी मोफत कृष्णा हाॅस्पीटल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 67 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर आमदार मोहनराव कदम, माजी आमदार भगवानराव साळुंखे, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजीराव पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, सौ. जयश्री पाटील, सौ. इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दिपक पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक राम पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, शेतीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणात होत असून, अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे शेतावर औषध फवारणी होत आहे. त्यामुळे कृषी उद्योगात आधुनिकीकरणाला मोठे महत्व आले आहे. कृष्णा कारखाना सभासद, कामगार यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहे. कृष्णा कारखान्यात राजकारणात पहिला बळी कामगारांचा जातो. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा कामगारांना राजकारणातून बाजूला केले. कामगार कोणाच्या वशिल्यावर नाहीतर मेरिटवर परमंनन्ट केला जाईल. आमच्यासाठी कोणताही कामगार जवळचा आणि लांबचा नाही.
व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी नोटीसीचे वाचन व मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादा पाटील, माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, माणिकराव पाटील, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, राजू मुल्ला, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, संचालक ब्रिजराज मोहिते, माजी संचालक पांडुरंग होनमाने, ब्रम्हानंद पाटील, महिपतराव पाटील, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रकाश पाटील, शिवाजीराव जाधव, तानाजी मोरे, अरविंद पाटील, संग्राम पाटील, राहुल पाटील, रामभाऊ माळी, वैभव जाखले, मनोज पाटील, संभाजीराव निकम, विश्वास पाटील, आप्पासो पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.