क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

तळबीड पोलिसांकडून दुचाकी चोरटा 24 तासात जेरबंद

कराड | तासवडे (ता. कराड) येथील एमआयडीसी मधील बी. के. इंजिनियरींग कंपनी समोरुन एक हिरो कंपनीची स्पेल्डर मोटार सायकल चोरी झाल्याची तक्रार तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. अवघ्या 24 तासाच्या आत या चोरीचा छडा तळबीड पोलिसांनी लावला असून या प्रकरणात गणेश राजाराम कुलकर्णी (वय- 34, रा. तासवडे- बेगरवस्ती ता. कराड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तळबीड पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसीतील एका कंपनी समोरून दुचाकी चोरीला गुरूवारी गेली होती. पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळच्या परिसारातील सीसीटीव्हीची पाहणी केली. सदर ठिकाणाहुन एक संशयीत इसमांचे फुटेज होते, फुटेच प्रमाणे संशयीत इसमाचे शोध घेत असताना गोपीनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सदर संशयित इसम हा एम. आय. डी. सी तासवडे परिसरात राहणारा असून सध्या तो टोलनाका परिसारात फिरत आहे. त्याप्रमाणे तळबीड पोलीस ठाणेच्या कर्मचारी यांनी सदर परिसरात जावून संशयित इसमाचा शोध घेतला. गणेश कुलकर्णी हा मोटार सायकल सह मिळून आला. सदर इसमास मोटार सायकलसह ताब्यात घेवून पोलीस ठाणेत आणून त्यांचेकडे कौशल्य पुर्वक चौकशी केली असता, त्यांने नमुद गुन्ह्यातील मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.

सदर इसमाकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली 35 हजार रूपये किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे. संशयित आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राहुल बरोटे, तळबीड पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक सहा पो.फौजदार काळे- खराडे, पोहेकॉ आप्पा ओंबासे, पोना/ काकासाहेब पाटील, पोना/ योगेश भोसले, पोना/संदेश दिक्षीत, पोकों/निलेश विभुते, पोकों/महेश घुटूकडे, पोकों/प्रविण गायकवाड, पोकों / प्रविण फडतरे, पोकों/अभय मोरे यांनी केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker