उदयनराजेंचं ठरलं अन् स्पष्टच सांगितलं : लोकसभा लढणार
मुख्यमंत्री म्हणाले, हॅपी बड्डे महाराज साहेब
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
छ. उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्ताने ते कोणती घोषणा करणार याकडे राजकीय क्षेत्रासह सातारकरांचे लक्ष लागून असताना. छ. उदयनराजेंनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, लोकसभेची मोहिम शब्द चांगला वापरला आहे. प्रत्येकाच्या मनात इच्छा असते, त्यात काही गैर नाही. आपल्याला वाटतं लोकांच्या माध्यमातून सभागृहात जाव.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदीर पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी उदयनराजे भोसले यांनी निवासस्थानी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझा संकल्प केवळ वाढदिसाला मर्यादित नसतो. सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली आहे अन् राजकारण कधी केलं नाही. केवळ समाजकारण केलं ते केवळ समाजाच्या हिताच केल. छ. शिवाजी महाराजांची जी कल्पना होती सर्व जातीधर्म समभावाची त्या कल्पनेवर मी चालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पना, सर्वधर्म समभावाच्या विचारानं मी वाटचाल केली आहे. कधीही जातीधर्मात भेदभाव केला नाही. देश अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण बंधुत्वाच्या भावनेतून राहणे गरजेचं आहे. नाहीतर युनायटेड स्टेटस॒ ऑफ अमेरिका आहे, तसेच आपल्याकडे होऊ नये, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असं आवाहन त्यांनी या वेळी केलं.
मराठा समाजाला मुख्यमंत्र्याचे आवाहन
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती. त्याप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. काही जण हे आरक्षण टिकणार नाही, असे सांगत आहेत. त्यांना संधी मिळाली पण त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला नाही. सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या त्रुटी काढल्या आहेत. त्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. मराठा समाजाने आंदोलन न करता संयम राखावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी केले.