उरूल सोसायटीच्या चेअरमनपदी शशिकांत निकम, व्हा. चेअरमनपदी चंद्रकांत देसाई बिनविरोध
पाटण | उरुल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी शशिकांत मोहनराव निकम व व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत पांडुरग देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन पेढे वाटप करीत आनंद साजरा केला.
नुकतीच उरुल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक होऊन पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा शेतकरी विकास पॅनेलने 13/0 असा ऐतिहासिक विजय मिळवत स्थापनेनंतर पहिल्यांदाच देसाई गटाने सत्ता स्थापन केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले होते. सर्वांनीच सोसायटीत काहीही झाले तरी सत्तांतर करायचेच असा चंग बांधला होता, त्यात यशस्वी झाले. निवडीनंतर नुतन पदाधिकारी व संचालक यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रसाद गुरव व सचिव जयसिंग चव्हाण यांनी कामकाज पाहीले.
यावेळी सर्व संचालक शिवाजी देसाई, बाळासाहेब निकम,आनंदराव निकम, सतिश पवार, शिवाजी मोकाशी, वसंत सुर्वे, भाऊसो कांबळे, सुभाष खामकर, संजय खामकर, तारुबाई जाधव, रत्नप्रभा साळुंखे यांच्यासह अनिल निकम, अॅड संग्राम निकम, सरपंच नितीन निकम, उपसरपंच सुनिल निकम, ग्रामपंचायत सदस्य सतिश निकम, संग्राम मोकाशी, अमर खामकर, सतिश खामकर, धैर्यशिल कांबळे, महेश निकम, शामराव चव्हाण, सुरेश दाभाडे, कृष्णाजी धनवडे, संदेश मोकाशी, अरुण पवार, चंद्रकांत सुर्वे, अशोक सुतार, शंकर देसाई, विजय निकम, विठ्ठल गायकवाड, महेश निकम, राजेंद्र थोरात, सचिन साळुंखे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.