बारामतीकरांचं प्रेम मला दहा हत्तीचं बळ देऊन जात : अजित पवारांच्या भाषणातील सर्व मुद्दे पहा
मोदींच काैतुक तर शरद पवारांच्याबाबत काहीच नाही, राजकीय भाष्य टाळले
पुणे – बारामतीत अजित पवारांचे पाचव्यांदा उमुख्यमंत्री झाल्यानंतर आयोजित सभेसाठी जंगी स्वागत करण्यात आले. अजित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार उपस्थित होते. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, जेसीबाने फुलांची उधळण करत अजित पवारांचं बारामतीत स्वागत करण्यात आलं. अजित पवार यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात कोणतीही कसूर सोडली नसल्याचं बघायला मिळत आहे. अजित पवारांच्या सभेच्या बॅंनरवर खा. शरद पवारांचा फोटो नव्हते. मात्र, घड्याळ चिन्ह बॅंनरवर वापरलेले होते. परंतु, खा. शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अजित पवार बोलले नाहीत. तसेच कोणत्याही पक्षावर टीका टीप्पणी केली नाही. केवळ बारामतीकरांसाठी काय केले अन् काय करणार यावरच अजित पवार बोलले. तर काही कोपरखळ्या मारल्या, त्यामुळे उपस्थितीतांच्यात मोठा हस्या पिकला.
अजित पवार यांच्या बारामतीमधील भाषणांची मुद्दे
तुम्ही झोपेत असताना मी कामं करतो
तुमच्या गर्दीमुळे कामाची साईटच पाहता येत नाही, म्हणून मी पहाटेच साईट पाहून येतो.
केंद्राने पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या आहेत
आज मी जो काही आहे, तो बारामतीकरांमुळेच आहे. त्यामुळे आज काय बोलावं असा प्रश्न आहे.
माझे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड स्वागत होईल, असे स्वप्नातही वाटत नव्हतं.
मी सत्तेला हापलेला कार्यकर्ता नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मी सत्तेचा ताम्रपट घेवून आलो नाही.
पुणे- नगर- नाशिक रेल्वेचे काम रेंगाळलेले आहे, ते मार्गी लावण्याचा काम करणार आहे. त्यासाठी मी दिल्लीला जाईन.
जगात मोदींनी देशाचे नाव उमटवले आहे.
मी मागे काही मोदी यांच्यावर टीका केली होती, अनेक सभा घेतल्या. पण आता अनेक काम रस्त्याच आपण पाहतोय. अनेक रस्ते बारामती आजूबाजूचे सुरू आहेत
मोदीच्या कामच दादांकडून बारामतीमध्ये सभेत कौतुक
बारामतीकराना आता चांगल्या सुविधा देण्यासाठी काम सुरू आहे
अनेक योजना पंतप्रधान यांच्या माध्यमातून येत आहेत. राज्याकडे त्या आपल्याला येतील
बारामतीकरांनी मला 1 लाखाच्या वर मतांने निवडून दिलं. पुढच्यांचं डिपाॅझिटच जप्त झालं.
त्यामुळे पहाटे उठलो की बायको म्हणते जरा दमान दमान, वय बघा आता
बारामती तालुका विद्येच माहेरघर म्हणून ओळख व्हायला लागलं आहे.
बारामतीकरांचं प्रेम मला दहा हत्तीचं बळ देऊन जात
अनेकांनी स्वागताला हातात हात दिले, मला वाटलं आता हात निघून जातोय की काय
काहींनी किस घेतले, एवढे किस घेतले जेवढे बायकोंनीही घेतले नाहीत (अजित दादांच्या या वाक्यावर हास्या पिकला)
आज देशात मोदींच्या सारखा नेता पाहिला मिळत नाही
नेहरू इंदिराजी यांच्या काळात देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला
राजीवजी यांनी संगणक क्रांती देशाने पाहिली,वाचपेयी,लाल बहादुर शास्त्री याच सरकार आलं,मनमोहन सिंग हे बोलत नाही
मोदी वर टीका करणाऱ्यांनी सांगव दुसरं कोण आहे….आणि महाराष्ट्रातील २८८ आमदारांमधील सर्वात लवकर उठून रात्री लेट पर्यत काम कोण करत सांगव (लोकांनी अजित पवार नाव घेतलं)
मलाही यासाठी महाराष्ट्र भर फिरायच आहे
अमित शहांनी महाराष्ट्राचा 11 हजार 500 कोटीचा टॅक्स माफ केला
कार्यकर्त्यांची मागणी दादा एकदा मुख्यमंत्री व्हा
२००४ ला झाला असता राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, पण नाही होऊ शकला असता
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा ही अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री होता आलं असत. पण तसे झाले नाही, त्या चर्चेत मी नव्हतोच
अजितदादांचे कार्यकर्त्याला मिश्किलपणाने उत्तर… उद्याच ये
बारामतीत अजित पवार आज दाखल झाले आहेत, त्यांची स्वागत सभा सुरु असताना एका कार्य़कर्त्याने जोरदार घोषणाबाजी त्यांच्यासाठी केली, कार्य़कर्त्यांनी एकच वादा, अजितदादा ही घोषणाबाजी सुरु ठेवली, या दरम्यान मिश्किल अजितदादा यांच्यातला मिश्किलपणा पुन्हा जागृत झाला आणि एकच वादा अजितदादा या घोषणेला उत्तर देताना म्हणाले, राहू दे, राहु दे, जोर राहु दे … उद्याच ये आणि एजन्सी याला देऊन टाका.