नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : कोयना धरणातून पाणी सोडणार
कराड | कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. धरणामध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून आज दि. 24 जुलै रोजी दुपारी 4:00 वा.1050 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे.
तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून ग्रामस्थांनी नदी पात्रात जावू नये. तसेच त्यांनी जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.
कोयनेला फिरायला जाताय तर थांबा
पाटण तालुक्यातील पाटण, नवजा या भागात पावसाने जोरदार हजेरी लावले आहे. या भागात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. ओझर्डे धबधबा परिसरात भूस्खलन तसेच पर्यटकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांना पर्यटन स्थळी जाताना काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.