Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

जुळेवाडीत दुचाकी घसरल्याने ओंड येथील एक ठार

कराड | दुचाकी घसरल्यामुळे रस्त्यावर आदळून एकजण ठार झाल्याची घटना घडली. जुळेवाडी (ता. कराड) येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सयाजी विठ्ठल पोळ (वय- 48, रा. ओंड, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंड येथील सयाजी पोळ हे कृष्णा कारखान्यात आॅपरेटर म्हणून नोकरीस होते. शुक्रवारी रात्री कामावरुन ते घरी जाण्यासाठी निघाले. जुळेवाडी गावच्या हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ते आले असताना अचानक त्यांची दुचाकी (क्र. एमएच- 50 आर- 7228) घसरली. त्यामुळे सयाजी पोळ हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांपैकी एकाने अपघाताबाबतची माहिती सयाजी यांचे चुलत भाऊ विलास पोळ यांना दिली. त्यामुळे तातडीने कुटूंबिय अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी सयाजी यांना उपचारार्थ कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close