कृषीखेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

विंग केसरीचा बहुमान बादल- शंकर बैलजोडीने पटकाविला

कराड | विंग येथील ग्रामदैवत श्री. हनुमान, श्री जोतिर्लिंग व श्री. सिध्देश्वर देवाच्या संयुक्त वार्षिक यात्रेनिमीत्त झालेल्या बैलगाड्या शर्यतीत चचेगाव (ता. कराड) येथील भैरवनाथ प्रसन्न याची बादल अणि शंकर जोडी अव्वल ठरली. रोख 31 हजार रूपयाचे बक्षिस मिळवून विंग केसरीचा बहुमान पटकावला. मावळत्या सुर्याच्या साक्षीने अंतिम क्षण पाहण्यासाठी प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती ठरली.

ग्रामदैवताच्या संयुक्त वार्षिक यात्रेचे खास आकर्षण बैलगाडी शर्यती झाल्या. सहा चाकोऱ्यातून झालेल्या स्पर्धेत सातारा जिल्ह्याच्या विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी 70 हून अधिक स्पर्धकानी सहभाग नोंदवला. साडेसहा वाजता अंतीम क्षणाला प्रारंभ झाला. प्रेक्षकाची उत्कंठा शिगेला पोहचलेल्या अंतीम क्षणी चचेगाव येथील भैरवनाथ प्रसन्न गाडी अव्वल ठरली. अनिल कचरे मित्रपरिवातर्फे प्रथम क्रमांकाचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. ओमकार वडगावे (घोणशी- रेठरे), मंगेश पाटील (जखिणवाडी), जोतिबाराजा प्रसन्न व धनुष चव्हाण (काले), देवराज पवार (आगाशिवनगर), इच्छापुर्ती गणेश प्रसन्न व आरव मोहिते (पोतले) या गाड्या द्वितीय ते सहा क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. उपसरपंच सचिन पाचुपते, विनोद घोरपडे व संजय पाटील, तानाजी डकरे सर, पक्षा सुंदर राणा कारगिल ग्रुप भगवा चौक विकास माने ग्रुप, तळबीडकर वडेवाले निलेश धस यांच्यावतीने रोख बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

विजेत्यांना लकी ट्रेडर्स संकेत खबाले व पोलीसपाटील रमेश खबाले यांनी विजेत्याना ढाल देऊन सहकार्य केले. अनिकेत घोरपडे, बाबासो पाटील, विशाल खबाले, आनंदा महिपाल, तानाजी शिंदे, अनिल गायकवाड, यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजय पाटील यांनी झेंडा पंच म्हणून काम पाहिले. बबलू देसाई व बाबुराव खबाले यांनी समालोचन केले. यात्रा समिती अध्यक्ष संपत खबाले, उपसरपंच सचिन पाचपते, तानाजी डकरे यासह ग्रामस्थांच्या हस्ते उदघाटनाने मैदानाला प्रारंभ झाला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker