मनोजदादा युवा मंचचे कार्य कौतुकास्पद : यशवंत साळुंखे
नागठाणे येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार (दि.22) रोजी नागठाणे येथे भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. सदर शिबिर एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल हडपसर पुणे आणि मनोजदादा घोरपडे युवा मंच कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन हनुमान मंदिर चौक नागठाणे येथे अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास मनोजदादा घोरपडे, विकम पावसकर, रविंद्र तेलतुंबडे, ज्येष्ठ नेते आनंदराव नलवडे, ॲड. धनाजी जाधव, वैजयाताई गुरव, श्रीरंग गोरे, राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी यशवंत साळुंखे म्हणाले, मनोजदादा युवा मंचचे कार्य कौतुकास्पद असून अशा प्रकारचे कार्यक्रम कायमच राबविण्यात येतात. आपण समाजात राहात असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो त्याच पद्धतीने मनोजदादांचे कार्य चालु आहे. त्यांचे राजकीय व सामाजिक काम पाहाता त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.
यावेळी मनोजदादा म्हणाले, अशी समाजसेवा करण्यात वेगळाच आनंद मिळतो. आजपर्र्यंत 6500 च्या दरम्यान मोतीबिंदु ऑपरेशन केली असुन एकाही रुग्णाला कोणतीच अडचण आली नाही. राजकारण करत असताना 20% राजकारण आणि 80% समाजकारण अशी कामाची पद्धत चालु आहे. येणाऱ्या काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील. यावेळी विक्रम पावसकर, श्रीरंग गोरे, रविंद्र तेलतुंबडे, राहुल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात 900 पेक्षा जास्त रुण्नांची तपासणी करण्यात आली तसेच 150 पेक्षा जास्त लोकांना मोतीबिंदू आहे त्यांना एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल व मनोजदादा युवा मंच यांच्या वतीने मोफत ऑपरेशन करून देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव नलवडे यांनी तर सुत्रसंचालन सागर ढाणे यांनी केले. आभार प्रदर्शन संजय काळभोर यांनी केले. या कार्यकमास सौ. रूपाली बेंद्रे, अनिल साळुंखे, नकुशा चव्हाण, मधुकर बाबा, सुधीर जाधव, संजय साळुंखे, शहाजी शेठ काळभोर, बजरंग जाधव, जालींदर आवळे, शंकर साळुंखे, सुनिल पाटील, अविनाश साळुंखे, लखन साळुंख, इंद्रजित ताटे, अदित्य दळवी, नागेश बेंद्रे, प्रशांत चव्हाण, आदि मान्यवर व विभागातील ग्रामस्थ महिला भगिंनी मोठया संख्येने उपस्थित होते.