क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसांगलीसातारा

उंब्रज हद्दीतील चोरट्याकडे 3 दुचाकी सापडल्या

कराड | उंब्रज (ता. कराड) गावचे हद्दीत श्रीराम बारचे उंब्रज पार्कींग मध्ये समोर असले मोकळ्या जागेत दिपक सर्जेराव थोरात (रा. साई सिटी अपार्टमेंट वाकुडे बु. ता. शिराळा जि. सांगली) यांचे मालकीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर ब्लॅक ग्रे मोटर सायकल (क्र. एम एच- 10 ईबी- 3126) हि अज्ञात चोरट्याने चोरली होती. याबाबत उंब्रज पोलीस गुन्हा दाखल करणेत आला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरी केलेली मोटर सायकल गणेश ऊर्फ पप्पु राजाराम कुलकर्णी (रा. बेघरबस्ती, तासवडे ता. कराड) याने चोरली असलेची माहिती मिळाली. सदरील व्यक्ती दुचाकी घेवून मसूर मार्गे उंब्रज बाजूकडे येत असलेची माहिती सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांना मिळाल्याने त्यांनी उंब्रज गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या. उंब्रज गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्टाफने शिवडे (ता. कराड) गावचे हद्दीत मसूर फाटा येथे याला  दुचाकीसह ताब्यात घेतला. संशयित आरोपीने आणखी दोन मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली आहे. दरम्यान संशयिताकडून तीन मोटर सायकल हस्तगत करुन 1 लाख 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपिनीक्षक अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. प्रमोद पाटील, तसेच होमगार्ड नागेश पाटील यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. ना. दिनेश भोसले हे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker