धर्मादाय वकील संघटना अध्यक्षपदी ॲड मोहन फडणीस


पुसेसावळी | पब्लिक ट्रस्ट प्रक्टीशनर्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून अध्यक्षपदी ॲड. मोहन फडणीस तर उपाध्यक्ष पदी ॲड. हेमंत फाटे, सचिव पदी ॲड. जी. बी. गवई व खजिनदार पदी ॲड. डी. डी. शहा यांची निवड सन 2023 ते 2024 या कालावधीसाठी झाली आहे. या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी ॲड. मोहन फडणीस, ॲड. दिलीपराव हांडे, ॲड. हेमंत फाटे, ॲड. जी. बी. गवई, ॲड. डी. डी. शहा, ॲड. मुकेश परदेशी, ॲड. विजय टिळेकर, ॲड. अमृता गुरव देशमुख, ॲड. डॉ. रोहिणी पवार, ॲड. राजेश ठाकूर, ॲड. अमित टकले यांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष ॲड. मोहन फडणीस यांनी संघटनेच्या सर्व वकील सभासदांचा व कार्यालयीन कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्ग यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाईल. धर्मादाय कार्यालयाचे कामकाज जलदगतीने होण्यास ऑनलाइन कार्यप्रणाली सक्षम करण्यासाठी पाठपुरावा पक्षकारांच्या व वकिलांच्या सोयीसाठी व्हर्चुअल हियरिंग त्वरित कार्यरत होण्यास प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच नूतन अध्यक्ष ॲड. मोहन फडणीस हे सातारा जिल्ह्यातील आहेत. पब्लिक ट्रस्ट प्रक्टीशनर्स असोसिएशनमध्ये त्यांनी सचिव व उपाध्यक्ष ही पदे भूषविली आहेत. उपाध्यक्ष ॲड. हेमंत फाटे यांनी सचिव व खजिनदार ही पदे भूषविली आहेत, सचिव ॲड. जी. बी. गवई हे अमरावती जिल्ह्यातील आहेत तर खजिनदार पदी ॲड. डी. डी. शहा हे पुणे येथील आहेत.
सन 1996 मध्ये पुणे विभागीय सहधर्मादाय आयुक्त कार्यालयात पब्लिक ट्रस्ट प्रक्टीशनर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. माजी धर्मादाय आयुक्त कै. आनंदराव काळे संस्थापक अध्यक्ष होते. गेल्या 25 वर्षात या संघटनेने विश्वस्त कायद्यात अनेक सुधारणा होण्यासाठी योगदान दिले आहे.



