कृषीक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

Video : विंग येथे 7 दुचाकी ऊसाच्या ट्राॅलीखाली चिरडल्या

कराड | विंग (ता. कराड) येथे गावातील मुख्य चाैकात उसाने भरलेला ट्रॅक्टरचा हुक तुटल्यामुळे ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्या उताराने खाली येऊन पाठीमागे उभ्या असलेल्या वाहनांवर आदळल्या. या दुर्घटनेत सात दुचाकी ऊसाच्या ट्राॅलीखाली चिरडल्या असून एक छोटा हत्ती, डंपर आणि ट्रकला धडकल्या. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित्तहानी झाली नाही.

याबाबतची अधिक माहिती अशी, विंग गावात सोमवारी आठवडा बाजार भरलेला असताना रयत कारखान्याकडे ऊस घेवून निघालेल्या ट्राॅलीची आणि ट्रॅक्टरमधील पीन तुटली. पीन तुटल्याने पाठीमागील दोन्ही ऊसाच्या ट्राॅली उताराला पाठीमागे गेल्या. यावेळी मुख्य चाैका उभ्या असलेल्या  सात मोटरसायकल, एक छोटा हत्ती, एक डंपर, ट्रक या वाहणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सुभाष बाबुराव शिंदे हे हे डंपर ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले आहेत.

विंग गावचा आज बाजार असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठी गर्दी राहते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. घटनास्थळी कोळे पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी दाखल झाले असून घटनेची माहिती घेत असून लोकांची मोठी गर्दी जमा झाली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close