kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या धाडसी चोरी! :अडीच लाखांची रोकड, सोने अन् पाच किलो चांदी

कराड :- साताऱ्यातील उंब्रज येथील चोरेरोड परिसरात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली आहे. उंब्रज येथील श्री वाग्देवी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश यादव-चोरेकर यांची दागिन्यांनी भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

दुचाकीवरून भरधाव वेगाने आलेला चोरटा सुमारे अडीच लाखांची रोकड, आठ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे पाच किलो चांदी असा मोठा ऐवज घेऊन पसार झाला. गणेश यादव यांनी तत्काळ चोरट्याचा पाठलाग केला. मात्र तो वेगाने निसटला. घटनास्थळी उंब्रज पोलीस दाखल झाले असून तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close