विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठताना चारीत्र्य जपावे :- विशाल पाटील
वसंतगड विद्यालयात इ.१० वी शुभचिंतन समारंभ संपन्न

तांबवे :- विद्यार्थ्यांनी जीवनात यशाचे शिखर गाठताना आपले चारीत्र्य जपले पाहीजे. स्वामी विवेकानंद सारख्या महान व्यक्तीचे विचार आत्मसात करून वाटचाल केली पाहीजे. विद्यार्थ्यांनी जीवनात स्वप्ने पहावीत, परंतु ती सत्यात आणण्यासाठी जागेपणी पाठलाग करावा, असे प्रतिपादन पत्रकार विशाल पाटील यांनी केले.

वसंतगड (ता. कराड) येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या श्री वि. ग. माने हाय. व ज्युनि कॉलेज मध्ये इ.१० वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून विशाल पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एच. डी. पाटील होते. यावेळी सेकंडरी को. ऑ. सेवा सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष जे. आर. पाटील, श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेचे सचिव रघुनाथ नलवडे (दादा), उपाध्यक्ष महीपती कोकरे,चंद्रकांत पाटील, तानाजीराव वाघमारे, बापूराव टोळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
जे. आर. पाटील सर म्हणाले ” विद्यार्थ्यांनी ध्येय, चिकाटी परीश्रम या जोरावर प्रयत्न केले तरच यश मिळते. शालेय जीवनात विद्याथ्यांनी सर्व उपक्रमात भाग घेतला पाहीजे.
याप्रसंगी मुख्याध्यापक मंदार दिक्षित, शिवाजी पाटील, यशराज टोळे, ओम काटवटे, कु. साधना काटकर, संस्कृती निंबाळकर, ऋतुकी महाडीक, शर्वरी सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल काटकर यांनी केले. सुत्रसंचालन सत्यवान सुर्वे यांनी केले. तर आभार संजय गोतरणे यांनी मानले.



