हर्षवर्धन सदगीरने हरियाणाच्या पैलवानाला निकाल डावावर धूळ चारली
सुर्लीत ज्योतिर्लिंग यात्रा आणि पीर राजेवली उरुसानिमित्त कुस्ती मैदान


कराड:- सुर्ली (ता. कराड) येथील कुस्ती मैदानात झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने हरियाणाच्या अजयला निकाल डावावर धूळ चारली. मैदानात लहान गटातील मल्लांनी चटकदार कुस्त्या करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
https://www.instagram.com/reel/DW5ggfgFuRQ/?igsh=MTB6czgxOGdvZ2xsOQ==
ज्योतिर्लिंग यात्रा आणि पीर राजेवली उरुसानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. हर्षवर्धन सदगीर विरुद्ध अजय हरियाणा ही कुस्ती माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, युवा नेते विक्रमनाना घोरपडे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, बाळासाहेब खबाले-पाटील, हिंदकेसरी संतोषआबा वेताळ, कामगार नेते नवनाथ पाटील,अजय भोंगे, अमित डुबल, महेश चव्हाण, मुरलीधर पोळ, विनायक भोसले,सतिश डांगे, दिगंबर डांगे, सुधीर डांगे,कृष्णात मदने, हणमंत ढमाले, सतिश वेताळ, वैभव डोंब, सचिन माने, दत्तात्रय वेताळ, अमोल भोगे,निसार मुल्ला, भिमराव माने, सुदेश वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मैदानात इतर गटातील अटीतटीच्या लढतीत निखिल पाटील याने मोहंमद मुजावर याला घिस्सा डावावर चितपट केले. अथर्व वेताळने विराजला एकलंगी डावावर नमविले. स्वप्नील मदने पुढे सोपानची डाळ शिजली नाही.राज भोंगे, स्वप्नील पाटील, पवन डुबल,सुशांत टेंगरे,देवराज गुरव, गणेश फडतरे,विराज माने, प्रणव पाटील यांनी प्रेक्षणीय विजय मिळवला. जोतीराम वाजे यांनी समालोचन केले.
बरोबरीत कुस्त्या सुटल्या
मैदानात सिद्धेश साळुंखे विरुद्ध विनायक दिघवड, भारत पवार विरुद्ध आण्णा पाटील, तेजस ढमाले विरुद्ध संतोष रुपनवर, स्वप्नील पाटील विरुद्ध सुयोग होनमाने यांच्यात बराच वेळ लढत सुरू होती. मात्र पंचांनी या कुस्त्या बरोबरीत सोडविण्याचा निर्णय घेतला.



