क्राइमताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यसातारासामाजिक

कराड शहर व तालुका पोलिसांच्या हद्दीतून 72 जण हद्दपार

कराड | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातून पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या 36 जणांच्या हद्दपारचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले होते. मंगळवारी या प्रस्तावांना मान्यता मिळाली असून शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेकडून संबंधित 36 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. गुरूवारी अनंत चतुर्थी दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. तर कराड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 40 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव दिले होते, त्यापैकी 36 जणांना हद्दपार करण्याचे आदेश दिल्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. कराड शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एकूण 72 जणांच्या हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहेत.

कराड शहर व तालुक्यात गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. संबंधित 72 जणांना पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास तसेच वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. कराड तालुका पोलिस निरीक्षक विजय पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह गुन्हे शाखेकडून संबंधितांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

हद्दपार केलेल्यांमध्ये प्रद्युम्न उर्फ पद्या सोळवंडे, रोहित जाधव, सोमनाथ सूर्यवंशी, शेखर उर्फ बाळू सूर्यवंशी, गौरव बनसोडे, मुस्तकीन पटेल, चेतन उर्फ गुन्नू देवकुळे, निशिकांत शिंदे, अक्षय नाटकर, शुभम काकडे, समीर उर्फ सॅम मोमीन, अल्फाज शेख, अकिब पठाण, विजय पुजारी, ऋषिकेश सावंत, प्रतीक साठे, कुंदन कराडकर, परशुराम करवले, गणेश वायदंडे, शिवसागर उर्फ डोक्या नलवडे, शिवराज इंगवले, योगेश भोसले, सत्यजित सूर्यवंशी, विशाल उर्फ चिंग्या घोडके, पवन भोसले, बजरंग उर्फ बजा माने, आदित्य घाडगे, अमीर शेख, शुभम जाधव, हमीद शेख, अर्जुन कुंभार, श्रीधर थोरवडे, अभिजीत पाटोळे, आकाश उर्फ सोन्या रावखंडे, संकेत डांगे, बाळू उर्फ आशिष कुरले, अतीश थोरवडे यांचा समावेश आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker