वाण्याचीवाडी लोकनियुक्त सरपंचपदी राष्ट्रवादीचे शरद चव्हाण विजयी

मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
वाण्याचीवाडी (ता.कराड) ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत जनशक्ती पॅनलचे उमेदवार शरद किसन चव्हाण हे लोकनियुक्त सरपंच व सतीश हणमंत पवार हे सदस्यपदी बहुमताने विजयी झाले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जनशक्ती पॅनलच्या समर्थकांनी गुलालाच्या उधळणीत एकच जल्लोष केला. विजयी उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची कराडच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली, यावेळी आमदार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे यांनीही विजयी उमेदवारांचा सत्कार केला.
वाण्याचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद व एक सदस्यपद रिक्त होते. या रिक्त जागासाठी गुरुवारी मतदान झाले होते. आज मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. जनशक्ती पॅनलचे लोकनियुक्त सरपंचपदाचे उमेदवार शरद चव्हाण यांना 424 तर विरोधी पॅनलचे वज्रेश्वरी ग्रामविकास पॅनलचे उमेदवार नितीन धस यांना 300 मते पडली. सदस्य पदाच्या लढतीत जनशक्ती पॅनलचे सतीश हणमंत पवार यांना 272 तर विरोधी वज्रेश्वरी ग्रामविकास पॅनलचे उमेदवार पांडुरंग बाबुराव चव्हाण यांना 160 मते पडली.
या विजयानंतर शिवाजी सुतार, प्रमोद उमरदंड, शंकर धस, संजय चव्हाण, अनंत सुतार, राहुल जाधव, सचिन मोरे, भानुदास साळुंखे, सचिन साळुंखे, बबन साळुंखे, गनिबा फकीर, मकबूल फकीर, महादेव चव्हाण, सुदाम चव्हाण, विजय चव्हाण, सुरेश निकम, संतोष निकम, लक्ष्मण साळुंखे, शंकर साळुंखे, भानुदास सावंत, विजय पवार, निलेश पवार, प्रकाश चव्हाण, सदाशिव चव्हाण, हणमंत माने, वसंत चव्हाण, अनिल खोत, मधुकर खोत, उदय धस, विशाल चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.