सातारा जिल्ह्यातील ‘या’ मार्गावरील वाहतुकीत बदल : पुढील 3 दिवस वाहतूक बंद
सातारा | सातारा ते लोणंद या राज्यमार्गावर काळीमोरी रेल्वे पुलाजवळ मध्ये रेल्वे विभाग, पुणे यांच्याकडून नवीन रेल्वे पुल बांधण्यात येत आहे. तेथील सध्याचा वाहतुकीचा पुल काढून टाकण्यात येणार आहे व दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी 13 ऑक्टोंबरपर्यंत अंतर्गत वाहतुकीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बदल केला आहे.
पुणे- लोणंद मार्गे साताराकडे तसेच फलटण वरुन साताराकडे येणारी अवजड वाहतूक लोणंद वरुन खंडाळा/शिरवळ मार्गे पुणे- बेंगलोर हायवे वरुन साताराकडे जाईल. साताऱ्याकडून वाढे फाटा ते लोणंदकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक वाढे फाट्यावरुन न वळवता सरळ पुणे- बेंगलोर महामार्गाने शिरवळ मार्ग लोणंदकडे जाईल. फलटण वरुन साताराकडे येणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने फौजी ढाबा येथून तडवळे स.वा. मार्गे पिंपोडे बु. ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन मार्गे साताराकडे जातील.
लोणंद- सालपे मार्गे येणारी हलकी व दुचाकी वाहने तडवळे स.वा. मार्गे पिंपाडे बु. ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन मार्गे सातारा/कोरेगावकडे जातील. सातारा/कोरेगाव कडून लोणंद व फलटण बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने वाग्देव चौक वाठार स्टेशन मार्गे पिंपोडे बु. ते तडवळे स.वा. ते लाणंद/फौजी ढाबा मार्गे फलटणकडे जातील. आदर्की फाटा येथील फौजी ढाबा ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन हा रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.