kota acadamy karad
कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

कराड बाजार समिती निवडणूक : आज 13 जणांची माघार, उद्या शेवटचा दिवस

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीतून आज अखेर 15 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. तर आजच्या एका दिवसात 13 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 18 जागांसाठी अद्याप 59 जण निवडणूक रिंगणात आहेत. उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने अंतिम चित्र दुपारी तीन नंतर स्पष्ट होणार आहे.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज अर्ज माघारी घेतल्यांची नावे व मतदार संघ पुढीलप्रमाणे : सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ :- उद्धव राजाराम जाधव, राहुल अमृतराव पवार, महेश प्रल्हाद काटकर, महिला राखीव गटातूनः- शहाबाई खाशाबा शिंदे, इतर मागास प्रवर्गातून ः- मारुती पांडुरंग माळी, अर्जुन जनार्दन कुंभार, संपत लक्ष्मण कुंभार, विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून ः- काशिनाथ विठ्ठल कारंडे, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून ः- अभिजीत दिनकर मोरे, तुकाराम निवृत्ती डुबल, प्रतापसिंह आनंदराव पाटील व  अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून ः- तानाजी शंकर थोरात

काल मंगळवारी महिला राखीव मतदारसंघातून ः- सुरेखा सुरेश देसाई यांनी तर सोमवारी 1 उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे छाननीतून पात्र 73 अर्जापैकी 15 जणांनी आजपर्यंत माघार घेतली आहे. आता उद्या गुरूवारी दि. 20 रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने कोण अर्ज ठेवणार व कोण काढणार हे उद्या दुपारी 3 वाजता चित्र स्पष्ट होणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close