सातारा जिल्ह्यातील 29 गुन्ह्यात फरार आरोपी जेरबंद : 10 पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे 29 गुन्हे दाखल असलेला आरोपी फरार होता. यामध्ये पुसेगाव पोलीस ठाणे 18 गुन्हे, कोरेगाव पोलीस ठाणे 1, आैंध पोलीस ठाणे 2, वडूज पोलीस ठाणे 1, दहिवडी पोलीस ठाणे 1 गुन्हा, म्हसवड पोलीस ठाणे 1, उंब्रज पोलीस ठाणे 1, फलटण शहर पोलीस ठाणे 1, सातारा शहर पोलीस ठाणे 2 आणि कराड शहर पोलीस ठाणे 1 असे गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी अभय झाकीर काळे यास पुसेगाव पोलीसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वर्धनगड (ता. खटाव) येथील गंभीर गुन्ह्यातील बऱ्याच कालावधीपासून फरार असलेला आरोपी अभय झाकीर काळे (मूळ राहणार- मोळ, ता. खटाव जि.सातारा) हा वर्धनगड परीसरात येणार असलेची माहीती मिळाली होती. सदरची गोपनीय माहीती मिळालेने पुसेगाव पोलीस ठाणेकडील एक तपास पथक तयार करून मौजे वर्धनगड येथे नमूद आरोपीचा शोध घेत होते. यावेळी एका घराचे आडोशाला सदरचा आरोपी दबा धरून बसलेला दिसताच, पोलीसांनी त्यास सर्व बाजूंनी घेराव टाकला. आरोपीला पोलीस येत असल्याची चाहूल लागल्याने अभय काळे हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलीस पथकाने करून आरोपीस पाठलाग करून ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, कोरेगाव उपविभागिय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष कांबळे, पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, प्रमोद कदम, अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे, अमोल जगदाळे, महीला पोलीस कविता बरकडे, होमगार्ड सुरेंद्र काटकर यांनी सदरची कारवाई केली आहे.