Uncategorizedताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

अपनी अकल लगाओ : आ. शिवेंद्रसिंहराजेंचा खा. छ. उदयनराजेंना टोला

सातारा | नगरपालिकेची सत्ता असताना काही केलेलं नाही, असे लोक आज नारळ फोडत आहेत. आपल्या हद्दवाढीला 33 वर्ष विरोध केला. जिल्हा परिषदेत यांची लोक सत्तेत राहावीत, त्यामुळे त्यांनी हद्दवाढीला विरोध केला. पाण्यापासून रस्त्यापर्यंत डेव्हलपमेंटची काम आपण करित आहोत. गोडोली तळ्याचे सुशोभीकरणाचे काम डीपीडीसीच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे जात आहे. आपले नेते डीपीडीसीला हजर असतात का तेव्हा ‘दिखावे पर मत जाओ, अपनी अकल लगोओ’ असे म्हणत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खा. छ. उदयनराजे भोसले यांना नांव न घेता टोला लगावला.

विलासपूर- सातारा येथे रात्री झालेल्या आयोजित महिलांच्या कार्यक्रमात आमदार शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुढे आ. शिवेंद्रराजे म्हणाले, कोणतही काम राज्य सरकारने केलं की ते काम आम्ही केलं, असं उदयनराजे सांगत आहे. जी काम होत नाही याचा खापर इतरांवर फोडलं जात असल्याचा आरोप यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.

काम झाले की माझ्यामुळे झालं. अन् नाही झालं तर माझा संबध नाही, हे बोगसपणाचं राजकारण आहे. विलासपूर, शाहूनगर, गोळीबार मैदानाचा सुनियोजित विकास करू.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close