(Video) मराठ्याचा मोर्चा पुण्यात अन् मुख्यमंत्री गावी
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दरे (ता. महाबळेश्वर) येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. मुख्यमंत्री गावी येण्याचे कारण समोर आलेले नाही.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक समिर शेख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील, गट विकास अधिकारी अरुण मरभळ आदी उपस्थित होते.
मराठ्याचा मोर्चा पुण्यात अन् मुख्यमंत्री गावी
मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वातील मुंबईला निघालेला मोर्चा आज पुण्यात पोहचला असून प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. दोन दिवसात मुंबईत मोर्चा पोहचणार असून सरकारने ठोस निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा मुंबई जाम करण्याचा इशारा जरांगे- पाटलांनी दिला आहे. अशा परिस्थितीत मुंख्यमंत्री आपल्या मूळ दरे गावी आल्याने सोशल मिडियातून प्रश्न उपस्थित केले जावू लागले आहेत.