Hello News 2026 Sunil Bamane ADVT
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

सातारा जिल्ह्यातून शरीर व मालमत्ते विरुद्धचे गुन्हे करणाऱ्या 7 जण हद्दपार

सातारा :- जिल्ह्यातील सातारा शहर परिसरातील शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या ०७ इसमांच्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०६ महिने कालावधीकरिता केले हद्दपार करण्यात आले आहे.

टोळी प्रमुख १) ऋषिकेश उर्फ दादा शशिकांत पवार (वय २२ वर्षे रा. काळोशी, कोडोली ता. जि. सातारा), टोळी सदस्य २) जितेंद्र दिपक सुर्वे (वय २२ वर्षे रा. धनगरवाडी श्रीकृष्ण कॉलनी, कोडोली ता. जि. सातारा), ३) पृथ्वीराज भीमराव साळुंखे (रा. कोडोली ता. जि. सातारा), ४) संदिप दादा वलेकर (वय- २२ वर्षे रा. महाराजाची बाग धनगरवाडी कोडोली ता. जि. सातारा), ५) अनिकेत दादा वलेकर (वय- २२ वर्षे रा. महाराजाची बाग धनगरवाडी कोडोली ता. जि. सातारा), ६) प्रेम उर्फ बबलु विलास पार्टे (वय- २४ वर्षे रा. मेढा कोर्टाचे जवळ मेढा ता. जावली जि. सातारा), ७) सिद्धार्थ विवेक महाडिक (वय १८ वर्षे रा. श्रीकृष्ण कॉलनी कोडोली सातारा ता. जि. सातारा) यांचे टोळीवर दरोड्याची तयारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत पोचवून शिवीगाळ दमदाटी करणे, अनाधिकृतपणे प्रवेश करून शिवीगाळ दमदाटी करणे, हत्यारानिशी, बेकायदेशीर जमावाचा घटक होऊन शिवीगाळ दमदाटी करणे, बेकायदेशीर दारू विक्री करणे. यांसारखे गंभीर स्वरूपाचे दाखलपात्र गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सचिन म्हेत्रे,पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग यांनी केली होती.

‘कराड मर्चटचा १०५० कोटीचा व्यवसाय, १२ टक्के लाभांश – कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार

निखील पिंगळे, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्या टोळीची सुनावणी होऊन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०६ महिने कालावधीकरिता हद्दपारीचा आदेश पारित केला आहे. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सनस, सातारा शहर पोलीस ठाणेकडील पोहवा दिपक इंगवले, संदीप पवार, पोकॉ अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close