दुबार मतदारांची आकडेवारी खोटीच, पृथ्वीराज बाबा जनतेने केलेला पराभव मान्य करा : आ. अतुल भोसले
अतुल भोसलेंचे पत्रकार परिषदेतून पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांना प्रत्युत्तर

कराड (हॅलो न्यूज) :- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जो ५८ हजार दुबार मतदार असल्याचा आरोप केला आहे. तो धांदात खोटा आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून येता आले नाही, म्हणून मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेणे हे त्यांना शोभत नाही. वास्तविक जनतेने जो कौल दिला आहे. तो त्यांनी अजूनही मान्य केलेले नाही. जनतेने तुमचा पराभव केला आहे, हे तुम्हाला मान्य करा असा टोला आमदार अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुबार मतदार वाढीसह काही आरोप केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी डॉ. अतुल भोसले म्हणाले की, २०१९ मध्ये जेव्हा माझा पराभव झाला तेव्हा मी ईव्हीएम मशीनला दोष देत बसलो नाही. पराभव स्वीकारला. आता तुमचा पराभव झाला आहे तर तुम्हीही तो स्वीकारला पाहिजे.
मुंडेंबाबत असे बोलणे हे पृथ्वीराजबाबांना शोभत नाही…
आपण एक राज्याचे जबाबदार मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे असे असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलणे बरोबर नाही. राजकारणात अशा प्रकारची वक्तवे करणे योग्य नाही. त्यांनी उलट सकारात्मक पद्धतीने काम करावे, असा सल्ला आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी दिला.
जगाला तत्वज्ञान सांगायचे आणि तुमच्या…
पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील नातेवाईकांचेच चार ठिकाणी मतदान आहे. स्वतःच्या पीएनी देखील दोनदा मतदान केल्याचे उघड झाले आहे. असे असताना जगाला तत्वज्ञान सांगायचे आणि तुमच्या अंगाखाली अंधार कसा काय? अशा शब्दात निशाणा साधत आमदार अतुल भोसले यांनी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच बोगस मतदानाची आकडेवारी पत्रकार परिषदेत सादर केली.
५८ हजार मतदानाचा आकडा आला कुठून हाच खरा प्रश्न?
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात एसआयआर सर्व्हेक्षणाचे काम सुरु होण्यापूर्वी १० जून २०२६ रोजीपर्यंत मतदारांची संख्या ३ लाख ३ हजार २०२ इतकी होती. यापैकी २ लाख ६७ हजार १२१ मतदारांचे फॉर्म सरकारकडे आले असून २२ हजार २६३ इतकी मतदार कायमस्वरूपी आहेत. जे मतदार दुबार मतदार संख्या ४ हजार ५२८ असून हि प्रांताधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध आहे. असे असताना माजी मुख्यमंत्री यांनी ५८ हजार मतदाराचा आकडा सांगितला आहे तो त्यांच्याकडे आला कुठून हाच खरा आम्हाला देखील पडलेला प्रश्न असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले.



