श्री कालिकादेवी पतसंस्थेचा 15 टक्के लाभांश जाहीर : चेअरमन राजन वेळापुरे
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेची 39 वी वार्षिक सभा

कराड (हॅलो न्यूज) – कराड येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेला ३९ वर्षाची उज्वल परंपरा आहे. संस्थेने कराड व सातारा शाखेच्या माध्यमातुन ३१७ कोटीचा एकत्रित व्यवसाय करुन प्रगतीचे पुढचे पाऊल टाकले आहे. संस्थेने निव्वळ NPA चे प्रमाण शुन्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे. संस्थेने स्थापनेपासून अ वर्ग मिळवण्याची परंपरा या वर्षीही चालू ठेवली आहे. या आर्थिक
वर्षात ३ कोटी ७५ लाखावर नफा झाला असुन सभासदांना संस्था सातत्याने ३३ वर्षे १५% लाभांश देत आली आहे. यावर्षीही संस्थेने १५% लाभांश जाहिर केला आहे असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन राजन वेळापुरे यांनी केले.
कृष्णाबाई प्रीतिसंगम सांस्कृतिक केंद्र नविन येथे संस्थेच्या ३९ व्या वार्षिक सर्व साधारणसभेत ते बोलत होते. श्री कालिका
कुटुंब प्रमुख मुनीर बागवान सावकार, डॉ.संतोष मोहिरे, अरुण जाधव, व्हा.चेअरमन अनिल सोनवणे, राजेंद्रकुमार यादव, प्रा.अशोक चव्हाण, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे, श्रीमती जयाराणी जाधव, सीमा विभुते व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते.

चेअरमन श्री. वेळापुरे पुढे म्हणाले, संस्थेच्या ३८ वर्षाच्या वाटचालीमध्ये माजी नगराध्यक्ष स्व.जयवंतराव जाधव, संस्थापक स्व.गजानन उर्फ बाळासाहेब मोहिरे, स्व.जयंतीलाल भंडारी, स्व. महेश त्रिभुवणे यांनी प्रारंभीच्या काळात मोठे योगदान दिले आहे. संस्थेच्या
स्थापनेपासुन मुनीर बागवान सावकार ,विवेक वेळापुरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला आहे. तसेच संस्था अर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत.
संस्थेच्या कराड शहराच्या मुख्य बाजारपेठेत व सातारा येथे राजपथ कमानी हौदा समोर गुरुवार पेठ सातारा येथे स्वमालकीच्या अत्याधुनिक वास्तु आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या माध्यमातुन ई-पेमेंटद्वारे स्टॅम्प फी, रजिस्टर फी, GST, इंन्कमटॅक्स, व्हॅट, टी.डी.एस.,DHC,सर्च फी अशा सुविधांच्या बरोबर RTGS/ NEFT शासकीय ट्रेझरी चलने तसेच कराड शाखेत लॉकर सुविधा अशा सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.
साप्ताहिक ”हॅलो न्यूज” (Weekly ‘Hello News’) अंक 18 वा दि. 28 सप्टेंबर 2026
सभेच्या प्रारंभी प्रा.अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक करुन दिवंगतांना आदरांजली वाहिली. विवेक वेळापुरे, मुनीर बागवान सावकार, डॉ.संतोष मोहिरे, अरुण जाधव, राजेंद्रकुमार यादव, शरदचंद्र देसाई, अनिल सोनवणे , निरंजन मोहिरे यांनी विषय पत्रिकेप्रमाणे ठराव सभेसमोर मांडले. जयाराणी जाधव यांनी आभार मानले. संस्थेचे संस्थापक संचालक माजी चेअरमन डॉ.संतोष लक्ष्मणराव मोहिरे, दप्तरी शिपाई सर्जेराव आकाराम घारे यांच्या ३८ वर्षाच्या अखंड सेवेबद्दल तसेच कार्यलक्षी संचालक विवेक पद्मराज वेळापुरे यांच्या ३६ वर्ष सेवेबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
संस्थेचे सभासद व कायदेशीर सल्लागार अँड. सौ.ज्योती दिपक मोहिरे(तवटे), प्राचार्य धनाजीराव बळवंतराव देसाई व प्रा.डॉ. विलास सखाराम सुर्वे घारेवाडी यांचा सभेत विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सभेस संस्थापक संजीव मोहिरे, संचालक सुरेश भंडारी, डॉ.जयवंत सातपुते, सुरेश कोळेकर,संचालिका सौ.सीमा विभुते, सातारा शाखा सल्लागार औदुंबर कासार, मारुती सावंत, किरण
लखापती, संतोष भामरे, शिरिष गोडबोले (सीए), राजेंद्रकुमार साठे(संगणक सल्लागार), व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित
होते.



