सातारा जिल्ह्यातील ‘या’ एसटी आगारात बसखाली सातवीतील मुलगी चिरडली
वाई | आज शनिवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसस्थानाकावर आलेली एक शालेय विद्यार्थ्यींनी बसच्या चाकाखाली सापडली. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रावणी विकास अहिवळे (रा. सुलातनपूर, ता. वाई, जि. सातारा) असे मृत मुलीचे नांव आहे. या घटनेमुळे वाई बसस्थानाक परिसर काही काळ सुन्न झाले होते.
शनिवार, रविवार सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर, पाचगणीला जाणासाठी वाई बसस्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी हाेती. यामध्ये शनिवारची सकाळची शाळा सुटल्याने विद्यार्थी तसेच विद्यार्थींनी यांची लक्षणीय संख्या हाेती. या बसस्थनाकावर दुपारच्या सुमारास एक दुर्देवी घटना घडली. इयत्ता सातवीत शिकणा-याचा मुलीचा एसटीच्या (क्रमांक- एमएच- 14-बीटी- 0496) चाकाखाली सापडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कळताच वाई पाेलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शाळा सुटल्यावर गर्दीमुळे धक्का लागल्यामुळे श्रावणी चाकाखाली चिरडली गेली आहे. बसचालक जीवन भोसले (रा. नांदवळ) यांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाई बसस्थानकात नेहमीच गर्दी असल्याने त्या ठिकाणी कायम स्वरुपी पोलिस कर्मचारी नेमला जावा अशी मागणी लोकांकडून कायम होते आली आहे.