सडावाघापूर येथे अल्टो कार चालकांसह 300 फूट दरीत कोसळली : गाडीचा चक्काचूर
पाटण | पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या म्हावशी, गुजरवाडी सडावाघापूर रस्त्यावर घाटात टेबल लँड परिसरात मारुती अल्टो कार 300 फूट खोल दरीत कोसळली असून या अपघातात चालक जखमी झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून 200 ते 250 फूट दरीत कार गेल्यानंतर चालकाने बाहेर उडी मारली. या घटनेनंतर पाटण पोलिस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी जखमीला उपचारासाठी रूग्णालयात हलवले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सडावाघापूर येथे वीज वितरण कंपनीत कामाला असलेले कर्मचारी शहाजी व्यंकट भिसे (वय- 45 रा. नवारस्ता, ता. पाटण) हे सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कामावर निघाले होते. यावेळी सडावाघापूर येथे गाडी आल्यानंतर चालकाला काही कळण्याच्या आतच गाडी दरीत कोसळली. यावेळी चालक शहाजी भिसे गाडीतच होते. गाडी दरीत गेल्यानंतर जवळपास 200 ते 250 फूट चालक गाडीसोबत गेले, मात्र, त्यानंतर गाडी अंतरावर गाडी आदळली अन् गाडीचा चक्काचूर झाला. सुदैवाने काही सेंकदच अगोदर चालकाने गाडीतून बाहेर उडी घेतल्याने ते केवळ जखमी झाले आहेत.
घटनास्थळी पोलिस निरिक्षक विकास पाडळे, पीएसआय महेश पाटील, सफौ श्री. भरते, पो.हवा. वैभव पुजारी, पो. हवा. पगडे, पो. काँ. उमेश मोरे, राहुल हजारे, संतोष माने, सूरज चिंचकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. अपघातात मारुती अल्टोचा (एम. एच. 50 ए. 2173) चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळतात तात्काळ स्थानिक नागरिक व पाटण घटनास्थळी पोहोचले. पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने शहाजी भिसे यांना दरीतून बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिकेतून कराड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यामध्ये पुर्णपणे चक्काचूर झाला आहे.र