भाजपचे माजी आमदार स्पष्टच बोलले : विधानसभेला जयकुमार गोरेच, मला पक्ष तिकीट देणार नाही
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
अजून खटाव तालुका वेगळा झालेला नाही. खटाव, माण एकत्रच आहे. माणमध्ये 35 हजार मते जास्त असल्याने याचा फटका खटाव तालुक्यातील उमेदवारांना बसतो. त्यामुळे मी माणमधून विधानसभा लढणार नाही अन् पक्षही मला तिकीट देणार नाही. उलट आहे या उमेदवारालाच पक्ष तिकीट देणार असल्याचे मत भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी व्यक्त केले.
शासनाने नुकतीच दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई व खंडाळा तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून माण, खटाव तालुक्याचा समावेश न केल्याने माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आगामी 15 दिवसात माण- खटाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, अशी मागणी डाॅ. दिलीप येळगावकर यांनी केली आहे.
या वेळी माण तालुक्यातील बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही माणमधून निवडणूक रिंगणात उतरणार का, या प्रश्नावर डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, अजून खटाव आणि माण तालुका विधानसभेला एकत्र आहे. माण तालुक्यात 35 हजार मते जास्त असून, याचा फटका खटाव तालुक्यातून उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना बसतो. त्यामुळे मी माणमधून विधानसभा लढणार नाही कारण मला पक्षही तिकीट देणार नाही. उलट आहे सध्या जे आमदार आहेत, ते आ. जयकुमार गोरे यानांच पक्ष तिकीट देणार आहे. काही तालुके वेगळे करण्याचा व नवीन मतदारसंघ वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. नशिबाने खटाव तालुका वेगळा झाला तर मी निवडणूक लढेन.