ब्रिलिएंट क्लासेस : कराडच्या विद्यार्थिनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत गोल्ड मेडलसह जिल्ह्यात प्रथम

कराड :- ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन (GBSTA) तर्फे सन १९८१ पासून आयोजित करण्यात येणारी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ही एक अनोखी चार-टप्प्यांची स्पर्धा असून, तरुण शास्त्रज्ञांमध्ये जिज्ञासा, समस्या सोडवण्याची वृत्ती तसेच निरीक्षण आणि शारीरिक कौशल्यांमध्ये अचूकता विकसित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवतालच्या परिसराविषयी संवेदनशील बनवणे आणि गरज पडेल तेव्हा तर्कशुद्ध पुढाकार घेण्याचे धाडस निर्माण करणे, हा देखील जीबीएसटीएचा उद्देश आहे.

या प्रतिष्ठित स्पर्धेत ब्रिलिएंट क्लासेस, कराड द्वारा संचालित फाउंडेशन क्लासमधील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. तन्वीराजे प्रकाश पिसाळ हिने गोल्ड मेडल मिळवत संस्थेचा व कराड शहराचा मान उंचावला आहे, तर कु. माही महेश जाधव हिने सिल्वर मेडल प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत फक्त इयत्ता ६ वी व ९ वी मधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धा मराठी व इंग्रजी माध्यमात आयोजित केली जाते. सेमी-इंग्लिश विभागातील विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार इंग्रजी किंवा मराठी माध्यम निवडू शकतात. निवडलेले माध्यम स्पर्धेच्या पुढील सर्व टप्प्यांसाठी तेच राहते आणि त्यात कोणताही बदल करण्यास परवानगी दिली जात नाही. ही स्पर्धा महाराष्ट्र एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी तसेच इतर राज्य बोर्ड अशा सर्व बोर्डातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या यशामागे कठोर परिश्रम, पालकांचे सहकार्य तसेच ब्रिलिएंट क्लासेस, कराड येथील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले असून भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी अशा स्पर्धांमध्ये यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दी १५ एप्रिल पासून फाउंडेशन क्लासेस सुरू होत आहेत.मोजकेच प्रवेश शिल्लक आहेत तरी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.



