इसको बोलता हैं जिगर : प्रशांत दामलेची पोस्ट अन् संकर्षण कऱ्हाडे फुल्ल चर्चेत

पुणे। अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण अभिनेता प्रशांत दामले यांनी एक व्हिडिअो आणि पोस्टही केली आहे. त्यामुळे संकर्षम कऱ्हाडे याचे काैतुकही होत आहे. तर दुसरीकडे जगात भारी परभणी म्हणत नेटकऱ्यांनी त्याच्या कृतीला सलाम केला आहे. ‘नियम व अटी लागू’ हे मराठी नाटक सध्या सर्वत्र सुरू असून या दरम्यान एक किस्सा घडला असून तो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रशांत दामलेची चर्चेतील ती पोस्ट
काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बर वाटेनास झाल. साधारणपणे प्रयोग 12. 30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे, हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर. नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीडने चालु आहेत.
नियम व अटी लागू या नाटकात संकर्षण बरोबर अभिनेत्री अमृता देशमुख, प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. स्वत: संकर्षणने हे नाटक लिहिलं आहे. पुण्यातील कोथरूड येथे नाटकाचा प्रयोग पार पडल्यानंतर सर्व कलाकार मुंबईकडे रवाना झाली होती. यावेळी बसच्या ड्रायव्हरची तब्येत बिघडली अन् पुढील लोणावळ्यापर्यंत चालक म्हणून होता तो अभिनेता संकर्षण कऱ्हाडे.



