मराठ्यांचे साखळी उपोषण सुरूच तर 7 डिसेंबरला अधिवेशन : जरांगे घरी जाणार नाहीत
जालना | मराठवाड्यातील जालन्यात अंतरवाली सराटीत गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. जरांगे पाटील यांची सरकार आणि विविध मंत्र्यांकडून समजूत काढली जात आहे. मात्र जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी पोहचले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
मनोज जरांगे- पाटील यांच्याकडून सरकारला मुदत
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्ठमंडळाची झालेली चर्चा यशस्वी ठरलीय. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुदत दिली आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तसेच आता दिलेला वेळ शेवटचा आहे, असंही जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे.
मनोज जरांगे- पाटील यांचं आमरण उपोषण मागे
अंतरवाली सराटीत राज्य सरकारच्या शिष्ठमंडळाला मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आमरण उपोषण मागे घेत राज्य सरकारला 2 जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. मात्र तोपर्यंत साखळी उपोषण सुरुच राहणार आहे. तसेच दिवाळीचा सण असला तरी मनोज जरांगे पाटील घरी जाणार नाहीत.
अधिवेशन डिंसेबर महिन्यात
7 डिसेंबर पासून अधिवेशन सुरू होणार असून जे अॅडशिनल मुद्दे आहेत ते 10 डिसेंबर पर्यंत घेतले जातील असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता अधिवेशन डिसेंबर महिन्यात होणार असून यामध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय लागेल, असा मार्ग दिसू लागला आहे.