कोळेत दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी : 18 जणांवर गुन्हा दाखल
कराड | कोळे येथील दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांत आज सकाळी पोलिसांसमोरच ही जोरदार हाणामारी झाली. या मारामारी प्रकरणी त्यांनी तेथील दोन्ही मंडळाच्या 18 जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी हवालदार गणेश वेदपाठक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संबंधितावर सार्वजिनक ठिकाणी पोलिसांसमोर मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची माहिती अशी, कोळे येथील मोरया गणेश मंडळ आणि म्हाकुबाई गणेश मंडळाच्या गणेश मुर्तींचे काल विसर्जन होते. त्या दरम्यान दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. आज सकाळी दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते कोळेतील एसटी थांब्याजवळ एकमेकासमोर आले. तेथे जोरदार वादावादी झाली. त्याचे पर्यावसन मारमारीत झाले. तेथे पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी मारमारी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये विक्रम लक्ष्मण माने (वय- 24), रुद्रप्रताप उर्फ प्रसाद तानाजी लटके (वय- 24), नरेंद्र नथुराम शिणगारे (वय- 25), चेतन सुधीर कांबळे (वय- 24), मयुर रमेश पलंगे (वय- 30), संदिप लक्ष्मण फिरंगे (वय- 46), सुधीर मधुकर कांबळे (वय- 57), संतोष पांडुरंग शिणगारे (वय- 42), सुरेश जगन्नाथ देसाई (वय- 46), नथुराम मारुती शिणगारे (वय- 52), अमन इक्बाल बोजगर (वय- 23), विक्रम लक्ष्मण माने (वय- 24), मुनीर सय्यद बोजगर (वय- 52), अक्षय भिमराव शिणगारे (वय- 26), संजय कल्लाप्पा चव्हाण (वय- 43), सादिक हुसेन मुल्ला (वय- 25), अरमान मुनीर बोजगर (वय- 22), विराज विजय मसकर (वय- 19), संतोष दिनकर यमगर (वय- 34) यांचा समावेश आहे.
या हाणामारीत वरील 19 जणांसह अन्य सात ते आठ ओळखींवर या मारामारीत होते. दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्याना सुचना देवुन त्यांनी गणेशोत्सवासाठी परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी पोलिसांसमोरच सार्वजनिक शांतता भंग करुन मारामारी केली, अशी फिर्याद हवालदार वेदपाठक यांनी दिली आहे. त्यावरुन संबंधित 18 जणांसह अन्य ओळखीच्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.