आरोग्यकोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमुंबईराज्यसांगलीसातारासोलापूर

गुंतागुंतीच्या ह्रदयरोग शस्त्रक्रिया आता कराडमध्ये…

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया

कराड, :- सह्याद्रि सुपर स्पेशियालिटी हॉस्पिटल, कराड हे गेली १३ वर्षांहून अधिक काळापासून सर्व प्रकारच्या उपचारांची सुविधा कराड मधेच उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहे. परिपूर्ण हृदयरोग व ह्रदयरोग शस्त्रक्रिया विभाग हे त्यांचे विशेष प्रावीण्य एक दशकाहुन काळ अधिक राहिले आहे, आणि गेल्या एका वर्षापासून हा विभाग अनेक नविन प्रयत्न करात आहे ज्यामुळे लहान शिशुनपासून ते वृद्धांपर्यंत सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या हृदयरोग व हृदयरोग शस्त्रक्रिया जागतिक दर्जाच्या बरोबरीने सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये होत आहेत.

कराड येथील सह्याद्रि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ, डॉ. अमृत नेर्लीकर म्हणाले, “गेली अनेक वर्षे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये हृदयशास्त्रक्रिया करत आहे, सह्याद्रि सुपर स्पेशियालिटी हॉस्पिटल, कराड हृदयरोग उपचारांसाठी योग्य असण्याचे कारण म्हणजे सर्व अनुभवी तज्ज्ञांची एकत्रित उपलब्धता, यामुळेच सर्व गुंतागुंतीच्या हृदयरोग शस्त्रक्रिया आम्ही येथे सहज करू शकतो. नुकतीच ४६ वर्षीय रुग्णावर आम्ही यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली, त्याला ट्रिपल व्हेसल डीसीज म्हणजे तिन्ही हृदयाच्या वाहिन्या बंद होत्या, यासाठी बायपास शस्त्रक्रिया आम्ही लिमा रीमा नामक तंत्र वापरून केली, यामध्ये पायाच्या शिरेऐवजी हृदयाच्या डाव्या आणि उजव्या इंटर्नल मेमरी आर्टेरि नामक धमन्या वापरल्या जातात, या साठी विशेष प्राविण्य व प्रदीर्घ अनुभव असणे अगदी महत्वाचे ठरते. या धमन्या वापरल्याने पारंपरिक शस्त्रक्रिया पेक्षा परिणाम हे अधिक चांगले व दीर्घकालीन टिकणारे असल्याचे सिद्ध झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत अगदी लवकर सुधारणा झाली आणि अगदी ४ दिवसांमध्ये रुग्णाला डिस्चार्ज करणे आम्हाला शक्य झाले.”

कराड येथील सह्याद्रि सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ, डॉ. हर्षवर्धन सायगावकर यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “कोणतीही हृदय शस्त्रक्रिया हि कार्डियाक अनास्थेसिस्ट (हृदयाला भुल देऊ शकणारे विशेष तज्ज्ञ), परफ्यूजनिस्ट, जे हृदय-फुफ्फुस यंत्रणा (Heart-Lung Machine) चालवून रुग्णाच्या शरीरात रक्त पुरवठा व ऑक्सिजनची पातळी स्थिर राखतात, जेणेकरून अचूक व सुरक्षितपणे शस्त्रक्रिया करता येते, व कार्डियाक इंटेन्सिव्ह केयर म्हणजे शस्त्रक्रियेनंतर बारीक लक्ष ठेवण्यासाठी व गरज भासल्यास रिएक्सप्लोरेशन म्हणजे परत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यायोग्य तज्ज्ञाची उपलब्धता असल्याने आम्हाला येथे चांगले उपचार देणे शक्य होते आहे. ऑन-पंप व ऑफ-पंप, मल्टी-व्हेसल, कॉम्प्लेक्स डिस्टल अ‍ॅनास्टोमोसेस, कोरोनरी एन्डआर्टरेक्टॉमी, माइट्रल/ एओर्टिक/ ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह रिपेअर व रिप्लेसमेंट, कॉम्प्लेक्स रीकन्स्ट्रक्शन, कॅल्सिफिक/ इन्फेक्टिव्ह एन्डोकार्डायटिसमधील व्हॉल्व्ह सर्जरी, मिनिमली इनव्हेसिव्ह CABG – जिथे अगदी लहान छेदातून शस्त्रक्रिया केली जाते तसेच ASD/VSD/AVSD क्लोजर, PDA लिगेशन सारख्या लहान शिशूंच्या जन्मजात दोषांवर आम्ही उपचार करतो”

डॉ. अमित माने, युनिट हेड, सह्याद्रि हॉस्पिटल कराड, म्हणाले, “अगदी शिशु ते वृद्ध, साधी किंवा अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया आम्ही कराडमध्येच करू शकतो आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे, हृदयरोग तज्ज्ञ, हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ, हृदयशस्त्रक्रिया भूलतज्ज्ञ, परफ्यूजनिस्ट, तज्ज्ञ व अनुभवी ऑपेरेशन थियेटर स्टाफ, स्वतंत्र हृदयरोग आय सी यु विभागातील तज्ज्ञ डॉक्टर व नर्सेस यांची एकत्रित उपलब्धता. डॉ अमृत नेर्लीकर, डॉ हर्षवर्धन सायगावकर, डॉ राजेश कौशिष, डॉ रामप्रसाद चव्हाण, डॉ जमीर कामटे, डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ सचिन निकम, डॉ राहुल वलेकर, डॉ राम देसाई, डॉ महेश देशमुख याना या यशाचे श्रेय जाते. इलेक्ट्रोफिजिओलॉजी (EP) स्टडी हा हृदयाच्या विद्युत प्रणालीचा सखोल अभ्यास करणारा एक अत्याधुनिक चाचणी प्रकार आहे. या प्रक्रियेत बारीक, लवचिक ट्यूबमध्ये बसवलेल्या इलेक्ट्रोड्सच्या मदतीने हृदयातील विविध ठिकाणी विद्युत सिग्नल्स मोजले जातात. यामुळे हृदयाचे ठोके बिघडण्यामागचे नेमके कारण शोधणे शक्य होते.ही तपासणी डॉक्टरांना हृदयातील अनियमित ठोके (Arrhythmias) यांचे नेमके निदान करण्यास मदत करते आणि त्यानुसार औषधोपचार, ‘कॅथेटर एब्लेशन’ किंवा पेसमेकर/डिफिब्रिलेटर लावण्यासारखे योग्य उपचार ठरवता येतात, व हि सुविधाही उपलब्ध असल्याने रुग्णांना मदत होते.

रुग्णांच्या सोयीसाठी सर्व इन्शुरन्स, मुख्यमंत्री सहाय्यता निधि तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सह्याद्रिमध्ये उपलब्ध आहेत. गत वर्षी सह्याद्रि हॉस्पिटलच्या मिशन प्रेरणा अंतर्गत आम्ही नवजात शिशूंच्या अनेक मुलांवर यशस्वीरीत्या उपचार केले आहेत. सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराडचे संचालक दिलीप भाऊ चव्हाण हे देखील या सत्राच्या ब्रिफिंगला उपस्थित होते. जागतिक दर्जाची अत्याधुनिक कार्डिअ‍ॅक कॅथेटरायझेशन लॅब (Cath Lab), देशविदेशात शिक्षण घेतलेले व अनुभवी तज्ज्ञ, तसेच प्रशिक्षित व त्याच विभागात वर्षानुवर्षे काम केलेल्या स्टाफ मुळे सह्याद्रि हॉस्पिटल कराडमधील हृदयरोग व हृदयशास्त्रक्रिया विभागाला एका वेगळ्या उंचीवर नेत आहे व येत्या काळात उत्तरोत्तर अचूक रोगनिदान व उपचार करेल असे सूचक नक्कीच पाहावयास मिळते आहे.

यावेळी डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. रामप्रसाद चव्हाण, डॉ. हर्षवर्धन सायगावकर, डॉ. अमृत नेर्लीकर, दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker