साताऱ्यात कोयता हल्ला : युवा नेते संतोष भाऊ जाधव जखमी, तिसरी घटना
सातारा | संगम माऊली (ता. सातारा) येथील युवा नेते संतोष भाऊ जाधव यांच्यावर रात्री दोघांनी कोयतेने वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा शहरातील बाॅम्बे चाैकात गेल्या तीन दिवसात ही तिसरी हल्ल्याची घटना आहे. या हल्ल्यानंतर रात्री मोठा गोंधळ उडाला होता.
माहुली येथे संतोष जाधव यांच्या घरासमोर हा हल्ला झाला. हलल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पूर्वीच्या वादातून माफी मागायला म्हणून हल्ला झाला की टपरी लावण्याच्या कारणावरून यांचा पोलीस तपास करत आहेत. संतोष भाऊ जाधव यांच्यावर दोन हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. यामध्ये त्यांच्या डोक्याला जखम झाली. जखमी जाधव यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी संशयितांना पकडण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी माहुली परिसरातून काही मिनिटांतच दोघांना ताब्यात घेतले. पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती. या घटनेमुळे रात्री ११ वाजता बाॅम्बे रेस्टारंट परिसर व प्रतिभा हाॅस्पिटल परिसरात संतोष भाऊ जाधव यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.