उंब्रजला शिवसैनिकांकडून पाकिस्तान झेंड्याला जोडे मारले

उंब्रज प्रतिनिधी / श्रीकांत जाधव
पहलगाम जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, कराड उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जाहीर निषेध करत उंब्रज बाजारपेठे मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारो आंदोलन शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी उंब्रज बाजारपेठमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर छत्रपती शिवाजी महराज की जय, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारत झेंडा पेटवला. तसेच किती काळ आपण असे भ्याड हल्ले सहन करायचे आणि निष्पाप लोकांचा बळी द्यायचा, केंद्रातील सरकारने त्वरित पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे.आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा.अशी मागणी शिवसैनिकांनी केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख मा. श्री.सुनिल पाटील, तालुका प्रमुख संजय भोसले, उपतालुकाप्रमुख जीवन गायकवाड, रामकृष्ण शिंदे, किरण कदम, ज्ञानदेव जाधव, युवासेना जिल्हाधिकारी मिलिंद तोडकर, तालुका अधिकारी विक्रम पिसाळ, महेश साबळे, संदीप थोरात, शंकरराव घार्गे, अनिल माने कोंडीबा गुजले ,लक्ष्मण शंकरराव कांबळे, गोंजारे,महादेव भोंगाळे,अमजद मुसंडे, गणेश जांभळे, वेदांत नलवडे, विवेक कमाने, शंकर शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.