कराड पोलिसांनी 2 ठिकाणचा डाव उधळला : MD ड्रग्स आणि बंदूक विक्रीचा पर्दापाश

कराड ः- कराड पोलिसांनी कराड शहरातील शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमाने देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीचा कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने डाव उधळला. तर शेणोली बसस्टँण्ड परिसरात एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन) विक्रीचा डाव कराड तालुका पोलिसांनी उधळून लावला. याबाबतची सविस्तर माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अफताब बादशाह मोमीन (वय 24), रोहन मेहबुब शेख (वय 19, दोघेही रा. रा. मुजावर कॉलनी, कराड), अमर रघुनाथ पाटील (वय 23, रा. काले, ता. कराड) व ओंकार प्रकाश हिंगणे (वय 25, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा) अशी पिस्टल विक्रीतील संशयितांची नांवे असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रमुखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम, पोलीस हवालदार सतिश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धिरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव, सोनाली पिसाळ यांनी केली.
शेणोली बसस्टँण्ड परिसरात एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन) विक्रीकरीता आलेल्या दोघांना कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1.890 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन), दोन मोबाईल व एक दुचाकी असा सुमारे 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी एकास अटक केली असून एक विधीसंघर्ष बालक आहे. अजय यशवंत कापूरकर रा. जुळेवाडी, ता. कराड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
सदरची कारवाई डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक शितल कोल्हाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभय तावरे, पोलीस हवालदार राजू पाटोळे, धनंजय कोळी, शशिकांत काळे, संजय जाधव, विजय यादव, सचिन चिंचकर, प्रतिभा डेरे यांनी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत.
रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा समावेश
बेकायदा पिस्टल विक्रीप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यामध्ये ओंकार हिंगणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत. चौघांकडे कसून चौकशी सुरू असून ते कराडमधील कोणाला पिस्टल विक्री करणार होते. याचीही माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे डीवायएसपी राजश्री पाटील यांनी सांगितले.



