कराडला एक तास स्वच्छता मोहिमेत महसूल, नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग

कराड | कराड शहरात प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार यांच्या उपस्थितीत महसूल विभाग व नगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांनी एक तास स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. शहरातील विविध शाळेचे विद्यार्थी तसेच सामाजिक संघटना यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभागी घेतलेले दिसून आले.
महाराष्ट्र शासनाने दि. 15 सप्टेंबर ते दि. 02 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता हीच सेवा 2023 हा उपक्रम राबविणेत येत असून महात्मा गांधी जयंतीचे औचित्या साधून दि. 01 ऑक्टोंबर 2023 रोजी एक तारीख एक तास हा स्वच्छता उपक्रम कराड शहरामध्ये राबविणेचा निर्णय घेणेत आला होता. त्याअनुषंगाने आज दि. 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते 11 यावेळेत सदरचा उपक्रम कराड नगरपालिकेच्या हद्दीतील टाऊन हाॅल, नदीकाठ, शहरातील विविध रस्ते अशा 14 ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, आज लोहसभागातून स्वच्छता पंधरवडा मोहिम सुरू असून उद्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ही मोहिम राबविण्यात येईल. तालुक्यात ठिकठिकाणी हे स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असून सर्वांनी सहभाग घ्यावा. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार व लोकांच्या सहभागाने आपला परिसर अधिक स्वच्छ व सुंदर होवू शकतो.