शेतकऱ्याला चार वर्षापूर्वीची उधारी मागितल्याने दुकानदाराला पाईपने मारहाण
माण | खत दुकानदाराने चार वर्षांपूर्वी उधारीवर दिलेल्या खत व औषधांची उधारी मागितल्याने मारहाणीचा प्रकार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडला आहे. या प्रकारामुळे खत दुकानदाराच्यात खळबळ उडाली. या प्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात बापलेकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, कुळकजाई (ता. माण) येथे चार वर्षापासून राहिलेली उधारी मागितल्याने लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी बोथे (ता. माण) येथील दोघांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमर सुधाकर कुलकर्णी (रा. कुळकजाई) यांनी फिर्याद दिली.
अमर कुलकर्णी यांचे कुळकजाईत योगेश्वरी ट्रेडर्स नावाचे खताचे दुकान असून संशयित बाळासाहेब गुलाब जगदाळे व कुणाल बाळासाहेब जगदाळे (दोघे रा. बोथे) हे दुकानात आले. त्यावेळी कुलकर्णी यांनी चार वर्षांपूर्वी दिलेले खत व औषधे यांची उधारी मागितली. त्यावर चिडून दोघांनी कुलकर्णी यांना लोखंडी पाईपने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. या मारहाणीत कुलकर्णी गंभीर जखमी जाले आहेत.