कराड तालुक्यातील ‘या’ गावात गाजांची लागवड : एकाला अटक
कराड | म्होप्रे (ता. कराड) येथील बेघर वसाहतीत घराच्या शेजारी लावलेल्या गांजाच्या झाडासहीत 11.870 कि. ग्रॅ. वजनाचा 1 लाख 26 हजार 920 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सोमनाथ पांडुरंग जाधव (रा. म्होप्रे, ता. कराड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांना बातमीदारा मार्फत म्होप्रे येथे गांजा लागवडची माहिती मिळाली होती. कराड तालुका पोलिसांनी बेघर वसाहतीत जावून सोमनाथ जाधव यांच्या शेतात छापा टाकून गांज्याची झाडे जप्त केली. पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कारवाईत 14. 048 कि.ग्रॅ. वजनाची 5 गांजाची झाडे तसेच आरोपीचे घरातून 0.822 ग्रॅम वजनाचा असा एकुण 11.870 कि. ग्रॅ. वजनाचा 1,26,920/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शना खाली अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी, पो. नि. विजय पाटील, पोउनि राजेंद्र पुजारी, स. फौ. सपाटे, पो. हवा. महेश लावंड, असिफ जमादार, प्रविण पवार, धनजंय कोळी, समीर कदम, नितीन कुचेकर, उत्तम कोळी, गणेश वेदपाठक, पो. ना. सागर बर्गे, दिपक कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, पो. कॉ. अनिकेत पवार, प्रफुल्ल गाडे, म. पो. कॉ. जयश्री डोईफोडे यांनी केलेली आहे.