क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगराज्यसातारा

नीरा नदीत उडी घेणारा कराड तालुक्यातील असल्याचा संशय

सातारा | पुणे- सातारा जिल्हा सीमेवर शिरवळ- शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथील नीरा नदीत एका व्यक्तीने उडी घेतल्याची घटना घडली आहे. पुलावर आढळलेल्या दुचाकीच्या माहितीवरून नीलेश काकडे या नावाची व्यक्ती असल्याची शक्यता राजगड (ता. भोर, जि. पुणे) पोलिसांनी व्यक्त केली आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने ही उडी घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप उडी घेतलेल्या व्यक्तीचा शोध लागलेला नाही. सदरील व्यक्तीची गाडी कराड पासिंग नंबर असून ओगलेवाडी येथील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत राजगड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नीलेश महादेव काकडे (वय- 40, मूळ रा. ओगलेवाडी, ता. कराड) हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेची फिर्याद नीलेश काकडे यांच्या मेव्हण्याने दिली आहे. यावरून तसेच नदीशेजारी आढळून आलेल्या एका दुचाकी (एमएच- 50 व्ही- 1347) वरून ती व्यक्ती नीलेश काकडे असल्याचा संशय राजगड पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

काल रात्र झाल्याने निरा नदीतील शोधमोहिम थांबविण्यात आली असून आज रेस्क्यू टीम व भोईराज शोध पथकाकडून शोध घेण्यात येणार आहे. नीलेश काकडे यांची पत्नीही काही दिवसांपासून बेपत्ता आहे. या कारणाने त्यांनी आपल्या सासरवाडी म्हसवड येथे मंगळवारी (ता. 8) मुक्काम केला होता. यानंतर आज सकाळी सवडवरून चिखली (पुणे) येथे कामावर जाण्यासाठी निघाले असता, निरा नदीत उडी घेतल्याचे समजत आहे..

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close