Election : जखिनवाडी, नांदलापूर विकास सोसायटीतील संचालकांचा सत्कार

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
जखिनवाडी, नांदलापूर विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांनी शेतकरी, सभासद व गरीब ग्रामस्थांच्या हिताचे कार्य करावे, असे आवाहन शेती मित्र अशोकराव थोरात यांनी केले. श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचे सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
सोसायटी निवडणुकीत पांडुरंग गणपती पाटील यांचे नेतृत्वाखाली रयत विकास पॅनलने मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. नवनिर्वाचित संचालक सत्कार प्रसंगी सचिन मोहिते, पंकज पाटील, अधिकराव पवार, बापूसो पाटील, निलेश नलवडे, किरण पाटील, श्रीकांत पाटील, गणेश पोतदार कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे ः- पांडुरंग पाटील, पंढरीनाथ पाटील, आनंदराव पाटील, माणिक नलवडे, अजित थोरात(काका), तानाजी पाटील, नाना पवार, रामचंद्र पाटील, लता पाटील(नलवडे), साधना विटुळे, सर्जेराव शिंदे, तुळशीराम शिर्के, आत्माराम बुधे यांचा सत्कार करण्यात आला.