क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

पुलाचे बांधकाम लक्षात न आल्याने महामार्गावर दुचाकीचा अपघात : दोघे जागीच ठार

खंडाळा | पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गुळुंब (ता. वाई) फाट्या जवळ सुरू असलेल्या पुलाच्या अर्धवट बांधकामावर दुचाकी आदळून दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना समोर आली.

Shree Furniture karad

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. साताऱ्यातील गुळुंब फाट्याजवळ सुरू असलेल्या पुलाचे बांधकाम लक्षात न आल्याने दुचाकीसह दोघे ओढ्यामधील पुलाच्या भिंतीवर आदळल्याने यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघाताची माहिती भुईंज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या मदतीने रात्री उशिरा दोन्ही मृतदेह बाहेर काढलेत. दोन्ही युवक वाई येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close