ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराजकियराज्यसातारा

जिल्हा परिषदेसाठी 8 तर पंचायत समितीसाठी 3 अर्ज दाखल.

कराड तालुक्यात एकूण 652 उमेदवारांनी अर्ज घेतले

कराड / प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील निवडणुकीची अर्ज प्रक्रिया भरण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद गटासाठी आजअखेर ६ जणांनी आठ अर्ज दाखल केले आहेत. तर पंचायत समिती गणासाठी ३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते.

आज सोमवारी जिल्हा परिषद गटासाठी आनंदराव जयसिंग पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक व अपक्ष दोन असे एकूण ३ अर्ज येळगाव जि. प. गटातून दाखल केले. तसेच नयनेश बाबुराव निकम यांनी पाल गटातून अपक्ष म्हणून, माधवराव निवृत्ती काळभोर यांनी पाल गटातून भाजपा कडून, सौ. सुनंदा नामदेव पाटील यांनी वारुंजी गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून, तर सौ. भाग्यश्री नयन पाटील यांनी वारुंजी गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आपापले अर्ज दाखल केले आहेत. तर पंचायत समिती गणासाठी संजय बाबुराव शेवाळे यांनी सवादे पंचायत समिती गणातून भाजपा कडून, गणेश जगन्नाथ पवार यांनी कोयना वसाहत गणातून अपक्ष म्हणून तर श्रीकांत पांडुरंग पाटील यांनी कोयना वसाहत गणातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आपले अर्ज दाखल केले.

निवडणूक कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी २९५ अर्जांची उमेदवारांकडून मागणी झाली आहे. कालपर्यंत ३५७ अर्जांची मागणी झाली होती. असे आज अखेर एकूण ६५२ उमेदवारी अर्ज इच्छुकांनी घेतले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्रात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close