kota acadamy karad
खेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रशैक्षणिकसातारासामाजिक

ऑलिंपिक स्पोर्ट्स क्लब खेळाडूंचा भविष्यकाळ सुवर्णमय करेल : नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव

कराडला वाखान रोडला नवीन क्रीडांगणाचे भूमिपूजन

कराड/प्रतिनिधी
कराड शहरातील खेळाडूंना तंत्रशुध्द खेळण्यासाठी आणि उत्तम मार्गदर्शन करण्याचे काम ऑलिंपिक स्पोर्ट्स क्लब करेल. खेळाडूंचा पुढील भविष्यकाळ सुवर्णमय करण्याचे काम ऑलिंपिक स्पोर्ट्स क्लब करतील असा, विश्वास कराड शहराचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला.

वाखान रोडला धनुप्रिया अपार्टमेंट समोर ऑलिंपिक स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडांगणाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, नगरसेवक अल्ताफभाई शिकलगार, नगरसेवक प्रवीण पवार, नगरसेवक विजयसिंह यादव, सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार, ऑलिंपिक खेळाडू, प्रशिक्षक वैष्णवी यादव, सोहेल संदे, संजय राठोड, दिलीप चिंचकर आदी उपस्थित होते.

कराड नगरपालिकेच्या वतीने पाणी आणि रोलिंग करून सुंदर ग्राउंड तयार करून दिले. तेव्हा कराड शहरातील व परिसरातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या ग्राउंडवर सराव व खेळण्यासाठी यावे असे आवाहन करण्यात आले आहे. सदरचे क्रीडांगण जागेचे मालक नितीन ओसवाल, गणेश पवार यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिले. त्याबद्दल ऑलिंपिक स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आभार मानण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close